Butterflies of Sindhudurg
Peacock Royal
Tajuria cippus (Lycaenidae)
![]() |
| पिकाॅक राॅयल (मादी) |
Family : Lycaenidae (Blues)
Scientific Name : Tajuria cippus (Fabricius, 1798)
Subspecies : T. cippus cippus (Fabricius, 1798)
Common Name : Peacock Royal
Marathi Name : मयुरेश
Wingspan : 3-4.5 cm
Host plant : बांडगूळ (Honey Suckle Mistletoe)
Protection : WPA-II (India)
Scientific Name : Tajuria cippus (Fabricius, 1798)
Subspecies : T. cippus cippus (Fabricius, 1798)
Common Name : Peacock Royal
Marathi Name : मयुरेश
Wingspan : 3-4.5 cm
Host plant : बांडगूळ (Honey Suckle Mistletoe)
Protection : WPA-II (India)
ओळख :-
"पिकाॅक राॅयल" हे भारत-मलेशिया पट्ट्यात आढळणारे राजस निल फुलपाखरू. याच्या वरच्या पंखांवर असणाऱ्या मोरपंखी रंगदिप्तींमुळे याचे नामकरण "पिकाॅक राॅयल" व "मयुरेश" करण्यात आले आहे. याचे शास्त्रीय नाव 'ताजुरिया सिप्पस' असे असून त्याचा समावेश लायसिनिडी किंवा निल कुळात होतो. हे फुलपाखरू भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा अनुसूची दोन अंतर्गत संरक्षित आहे.
आढळ व व्यवहार :-
बर्याच फुलांवर वावर असतो, त्याशिवाय पंख उघडून ऊन शेकताना दिसून येतात. नर चिखलपान करतात. बांडगूळ ही परजीवी वनस्पती याची खाद्य वनस्पती आहे.
वर्णन :-
पंखविस्तार 3-4.5 सेमी असूू शकतो. बंद पंखांचा रंग पांढरा-करडा असून त्यावर काळ्या खुणांच्या रांगा असतात. मागच्या पंखांच्या टोकाजवळ दोन केसरी-काळे ठिपके व त्यांना लागूनच दोन तारेसारख्या शेपट्या असतात. या खुणा व शेपट्यांमुळे शिकारी नेमके डोके ओळखण्यात गोंधळतो आणि त्यामुळे संरक्षण होते. उघड्या पंखांच्या वरच्या कडा जाड काळ्या असून, नरामध्ये मधला भाग लखलखीत निळसर-मोरपंखी तर मादीमध्ये ठिपकेदार फिकट निळा असतो.
खाद्य वनस्पती :-
बांडगूळ (बांदा) - Honey Suckle Mistletoe
Dendrophthoe falcata (Loranthaceae)
बांडगूळ ही मोठ्या वृक्षांवर वाढणारी परजीवी वनस्पती आहे. ही वनस्पती इतर झाडांना त्रासदायक असल्याने सुरवंटांमार्फत जैवनियंत्रण हा संशोधनाचा विषय ठरू शकतो.
जीवनक्रम :-
अंडी पांढर्या रंगाची असून खाद्य वनस्पतीच्या पानांवर किंंवा खोडावर घातली जातात.
![]() |
| पिकाॅक राॅयल (अंडी) |
सुरवंट चार वेळा कात टाकतो, या रुपांना इन्स्टार असे म्हटले जाते. सुरवंट तपकिरी रंगाचा असून त्यावर करडे-पांढरे डाग असतात. त्यामुळे तो पक्ष्यांच्या विष्ठेसारखा दिसतो आणि त्याचे शिकर्यांंपासून संरक्षण होते. त्याची लांबी 2 सेमी पर्यंत वाढू शकते. सुरवंट मुंग्यांसोबत सहजीवन जगतो. सुरवंटाकडून मुंग्यांना मधासारखा गोड द्रव दिला जातो बदल्यात मुंग्यांच्या अस्तित्वामुळे सुरवंटाला इतर शिकार्यांंचा धोका नसतो.
![]() |
| पिकाॅक राॅयल (सुरवंट) |
कोष तपकिरी रंगाचा असतो. मागच्या टोकाने आधाराला चिकटलेला व आधारासलगच असतो.
आठ-दहा दिवसांनंतर कोषातून फुलपाखरू बाहेर येते.
निल - Blues
Lycaenidae > Theclinae > Iolaini



No comments:
Post a Comment