Butterflies of Sindhudurg
Crimson Rose
Pachliopta hector (Papilionidae)
![]() |
| क्रिमसन रोझ |
Family : Papilionidae (Swallowtails)
Scientific Name : Pachliopta hector (Linnaeus, 1758)
Common Name : Crimson Rose
Marathi Name : किरमिजी मदालसा
Wingspan : 8-11 cm
Host plant : सापसण (Indian Birthwort)
Protection : WPA-I (India)
Scientific Name : Pachliopta hector (Linnaeus, 1758)
Common Name : Crimson Rose
Marathi Name : किरमिजी मदालसा
Wingspan : 8-11 cm
Host plant : सापसण (Indian Birthwort)
Protection : WPA-I (India)
ओळख :-
"क्रिमसन रोझ" हे दक्षिण भारतात आढळणारे दुर्मिळ फुलपाखरू. याचे शास्त्रीय नाव 'पॅक्लिओप्टा हेक्टर' आणि याचा समावेश पॅपिलिऑनिडी (पूच्छ) कुळात होतो. आकर्षक रंग व विषारी शरीर यांमुळे याचे नामकरण "किरमिजी मदालसा" व "क्रिमसन रोझ" करण्यात आले आहे. हे फुलपाखरू भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा अनुसूची एक अंतर्गत संरक्षित आहे.
आढळ व व्यवहार :-
खूप उंच व जलद गतीने उडतात. मधुरसासाठी फुलांवर येतात. फार कमी वेळा, उंच झाडावर पंख पसरून ऊन शेकताना किंवा आराम करताना दिसतात. ही फुलपाखरे स्थलांतर करतात.
वर्णन :-
पंंखविस्तार 8-11 सेमी असतो. पंखांच्या दोन्ही बाजूंचा रंग काळा असून, पुढच्या पंखांवर तिरक्या पांढर्या रेषा तर मागच्या पंखांवर किरमिजी-लाल ठिपके असतात. पूच्छ कुळातील इतर फुलपाखरांप्रमाणे, मागच्या पंखांचे टोक वाढून शेपटीसारखे दिसते. नर-मादी सारखेच दिसतात. काही वेळा मादीतील लाल ठिपके फिकट असतात. शरीराचा रंग भडक लाल-काळा असतो. भडक रंगाचे शरीर हा शिकार्यांसाठी विषारी व धोक्याचा संकेत असतो. विषारी शरीरामुळे, काॅमन माॅरमाॅन मादीचे 'रोमुलस' रुप, संरक्षणासाठी याची नक्कल करते. शरीराचा आकार व रंग हा दोघांमधील मुख्य फरक. रोझचे शरीर लाल व आकार मोठा तर माॅरमाॅनचे शरीर काळे व आकार लहान असतो. तसेच काॅमन माॅरमाॅन मधील मागच्या पंखांवरील लाल ठिपके फिकट असतात.
![]() |
| क्रिमसन रोझ & काॅमन माॅरमाॅन 'रोमुलस' मादी (दोघांमधील तुलनात्मक फरक) |
खाद्य वनस्पती :-
सापसण (सापशीन) - Indian Birthwort
Aristolochia indica (Aristolochiaceae)
सापसण ही स्थानिक औषधी वेल असून जंगलात आढळते. या वनस्पतीत ॲरिस्टोलाॅकिक ॲसिड हा विषारी घटक असतो. यावर वाढणारे रोझ व बर्डविंग सुरवंट, हे विषारी घटक पचवतात व स्वतःचे शरीर विषारी बनवतात. त्यामुळे त्यांची शिकार होत नाही.
पूच्छ - Swallowtails
Papilionidae > Papilioninae > Troidini



No comments:
Post a Comment